Saturday, December 5, 2020
गंमत कोरोनाची
Saturday, April 4, 2020
नऊ मिनिटाचे आवाहन
Tuesday, March 24, 2020
स्ट्रिमिंग
Friday, March 20, 2020
२२ मार्च जनता कर्फ्यू
Monday, December 30, 2019
पान उलटूनी ...
Friday, December 20, 2019
मेंटेनंस कि रिपेयर
मेंटेनंस कि रिपेयर
Sunday, January 7, 2018
७/१/१८ च्या बैठकीचे इतिवृत्त
नमस्कार !
बैठकीचे इतिवृत्त
आज ७ जानेवारी २०१८, ज्या दिवसांची आपण सगळेच जण वाट पहात होतो तो दिवस ! पुण्यात सिंहगड रोडवर माणिकबाग येथील सिद्धार्थ हाॅल येथे बैठकीचे आयोजन केल होत व सुमारे ६५ जणांची उपस्थिति गृहित धरली होती. ऐन वेळच्या अडचणी, घरगुती समस्या, किंवा प्रकृतीअस्वास्थ्य यामुळे अनेक मंडळींना प्रबळ इच्छा असूनही त्यांचे येणे शेवटच्या क्षणी रहित करावे लागले. जे येऊ शकणार नव्हते त्यांच्या शुभेच्छा पाठिशी होत्याच परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक सदस्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती.
या पार्श्वभूमिवर आजच्या बैठकीला ३५ सदस्यांची उपस्थिति ही नुसती आशादायक नव्हे तर आपल्या नियोजित प्रकल्पाची भक्कम पायाभरणी करणारी ठरली हे नमूद करतांना मनस्वी आनंद होत आहे. एक विशिष्ट संकल्पना डोळ्यापुढे ठेवली आणि त्यासाठी एक व्हाॅट्स अॅप ग्रुप स्थापन करुन ज्या अॅडमिन मंडळींनी पहिले पाऊल टाकले त्या अॅडमिन मंडळींनी सर्वप्रथम आपआपला परिचय दिला. उपस्थित सगळेजण पहिल्यांदाच एकमेकांना पहात होते, भेटत होते त्यामुळे अॅडमिन मंडळींच्या परिचयानंतर उपस्थित प्रत्येक सदस्याने आपआपला परिचय करुन दिला.
मिटिंगची सुरुवात अॅडमिन सौ विद्या कुळकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. आपले मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या कि आर्थिक सुबत्ता ही प्रत्येकालाच हवी असते. ब्राह्मण व्यक्ति ही व्यवसाय करु शकत नाही हा भ्रम आहे. आपल्या कृतीने आपण हा दूर करुन दाखवू. यशस्वी उद्योजक होतांना आपल्या बांधवांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ देऊ असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतामधे व्यक्त केला.
श्री जयंत मुळे यांनी विचारांना चालना देणारा वेगळा व सकारात्मक दृष्टिकोण सदस्यांपुढे मांडला. गरीबीत जीवन कंठणारी ब्राह्मण मंडळी, मुले परदेशात असणारी वृद्ध मंडळी यासारख्या घटकांचाही विचार आपल्या कार्यात असावा. आपला समाज सुशिक्षित आहे व विविध क्षेत्रात नैपुण्य असणारा आहे. त्यांच्या हुषारीचा, कौशल्याचा आपल्यातील गरजवंतांसाठी कसा उपयोग करुन घेता येईल यावर योजना तयार व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
सदस्यांनी आपले मत मोकळेपणाने मांडतांनाच एकमेकांची मते, विचार समजावून घ्यावीत असा विचार श्री प्रसाद कुळकर्णी यांनी मांडला तर श्री नांदेडकर यांनी प्रत्येकाने किमान एक तास आपल्या समाजासाठी द्यावा असे आवाहन करतांना आपल्या बैठकीत झालेले निर्णय, चर्चा या आपआपल्या भागात, गावात असलेल्या अन्य सभासदांपर्यंत कळविण्याची सूचना केली.
आजकाल सर्वत्र आवश्यक बनलेल आधार कार्ड, त्याचा उपयोग आपणही सदस्यांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी करावा व एका छापील फाॅर्मवर सदस्य व त्याच्या कुटूंबाची सविस्तर माहिती आपल्या रेकाॅर्डवर ठेवावी अशी महत्वाची सूचना श्री दिलिप कुळकर्णी यांनी मांडली. श्री दिनेश तांबोळी यांनी आपल्यापैकी उद्योजक मंडळींना त्यांची उत्पादने आपल्या बांधवांसमोरही आणली जावी असा उपयुक्त प्रस्ताव मांडला.
श्री सतिश पुरंदरे यांनी महत्वाच्या म्हणजे आर्थिक विषयाला हात घातला. त्यांनी कल्पना समजावून सांगतांना आपण प्रायव्हेट लि. कंपनी तिचे पेडअप कॅपिटल वगैरे .. या धर्तीवर आपला ढाचा असावा असे म्हटले. सदस्यांना मदत / निधी देतांना नाॅन फंड बेस बँक गॅरंटी घ्यावी असे सुचविले. तसेच निधि संकलन व त्याचा विनियोग यावरही मत मांडले. तर श्री किरण दिक्षित यांनी निधीेच्या वाटपाचे नियम व निकष ठरवितांना क्रेडिट सोसायटीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल असा विचार मांडला.
श्री सिद्धार्थ बर्वे यांनी आपल्या "ब्राउनि"ने भांडवल पुरवठा करतांना त्या त्या उद्योगांशी ठराविक मुदतीसाठी भागीदारी करावी व भांडवलाची परतफेड झाल्यानंतर त्या उद्योगातून बाहेर पडावे अशी कल्पना मांडली. श्री चितळे यांनी आपआपल्या ओळखीतून सदस्यवृद्धिसाठी प्रयत्न करावा तसेच व्यवसाय विस्तार व नविन व्यवसाय असे ध्येय ठेवणाऱ्यांना मदतीचा हात द्यावा असा विचार ठेवला. सौ स्नेहल कुळकर्णी यांनी सभासद संख्यावाढीसाठी कार्य करण्यावर भर दिला. चाकोरीबद्ध जीवनाच्या चौकटीतून बाहेर पडून तरुण वर्गाने व्यवसायासाठी पुढे यावे व त्यासाठी प्रक्षिक्षण देण्यापासून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
सौ स्नेहल कुळकर्णी या आॅटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असून अशा प्रकारचे सामाजिक कार्य त्या करत आहेत.
श्री प्रविण नामजोशी यांनी पितृसंस्था उद्योजक विकास प्राधिकरण ही कल्पना विस्ताराने मांडली व श्री संकेत रोहगावकर यांनी त्याला सहमती दर्शविली. श्री शार्दुल जोशी हे कंपनी सचिव असून त्यांनी संघटना बनवितांना एक समिति बनविण्याची सूचना केली व सदस्य संख्येच्या वाढीनुसार समितिचा विस्तार करता येईल असे सांगितले. श्री संतोष करमरकर यांनी कंपनी अॅक्टच्या सेक्शन ८ वर आधारित आपली नियोजित संस्था आकाराला येऊ शकते का ? असा प्रश्न मांडून त्या अनुषंगाने काय करता येईल ? असे विचारले असता श्री तेजस पाटणकर यांनी हे कलम काही बाबतीत कसे अडचणीचे ठरते ते समजावून सांगितले.
श्री हेमंत कुळकर्णी, मनिष पाठक तसेच उपस्थित भगिनिंनी चर्चेत सहभागी होतांना चांगले मुद्दे, सुचना सादर करत आजच्या बैठकीत भरीव योगदान दिले. एकंदरित जी संस्था आपण स्थापन करण्याचा संकल्प करत आहोत त्याला घटना असावी यावर सगळ्यांचे एकमत झाले. या संस्थेचे स्वरुप प्रायव्हेट लि. असावे कि सहकारी संस्था ? या संस्थेने चॅरिटी करावी, देणगी द्यावी कि कर्ज ? तोटा झाला तर त्याचे काय करायचे ? या व यासारख्या अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळीशी चर्चा करण्यासाठी व त्याआधारे काही ठोस अंतिम पर्याय निवडण्यासाठी एक कोअर कमिटी स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले.
त्यानुसार उपस्थित सदस्यांपैकी स्वेच्छेने खालील सदस्यांनी या कोअर कमिटीत आपले योगदान देण्यासाठी संमती दर्शविली आहे. "हंगामी नियंत्रक समिती" असे समितीचे नामकरण झाले असून सदस्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१ जयंत मुळे
२ विद्या कुळकर्णी
३ प्रसाद कुळकर्णी
४ राम वैद्य
५ श्रीकांत वाकणकर
६ बिंदुमाधव भुरे
७ मनिष पाठक
८ समर्थ फणसळकर
९ सारंग नांदेडकर
१० संदीप स्वामी
११ सिद्धार्थ बर्वे
१२ योजना सुपेकर
१३ संगिता पुरंदरे
१४ प्राची बापट
१५ मुग्धा कुळकर्णी
१६ दिनेश तांबोळी
१७ संकेत रोहगावकर
१८ संतोष करमरकर
१९ सुधीर कौलगुड
या हंगामी समितीची पुढील बैठक लवकरच होईल. जे सदस्य आज येऊ शकले नाहीत त्यांनी त्यांच्या सुचना वादविवाद टाळण्यासाठी आपल्या ग्रुपवर न टाकता अॅडमिनपैकी कोणाकडेही व्यक्तिगत पाठवाव्यात. आजच्या बैठकीनंतर उपस्थित सर्व सदस्यांचा निर्धार हा आता दृढनिश्चयात परावर्तित झाला आहे हे नक्की, अर्थात प्रत्येक सदस्यांच्या शुभेच्छा त्यामागे एक अदृश्य शक्तीच्या स्वरुपात होत्या म्हणूनच हे शक्य झाले. बैठकीचे हे इतिवृत्त आपल्यासमोर ठेवतांना आम्हा अॅडमिन मंडळींना अतिशय आनंद होत आहेत.
शेवटी श्री प्रसाद कुळकर्णी यांनी या बैठकीच्या यशस्वितेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचे आभार मानले. हे इतिवृत्त बैठक सुरु असतांना लिहून काढले त्या आपल्यातील सगळ्यात ज्येष्ठ अशा श्री वाकणकरांचे विशेष आभार ! बैठक खास ब्राह्मणी भोजनाच्या आस्वादानंतर संपली.
आपले स्नेहांकित,
श्री जयंत मुळे
श्री संतोष करमरकर
श्री किरण दिक्षित
श्री श्रीकांत वाकणकर
श्री प्रसाद कुळकर्णी व
सौ विद्या कुळकर्णी.
Friday, October 13, 2017
१४ आॅक्टोबर, श्रद्धेय ठेंगडीजींचा स्मृतिदिन
१४ आक्टोबर, स्व. दत्तोपंत ठेंगडीजींचा स्मृतिदिन
२३ जुलै १९५५ रोजी एका पत्रकार परिषदेत स्व. दत्तोपंत ठेंगडीजींनी भारतीय मजदूर संघाची स्थापना झाल्याची घोषणा केली आणि कामगार क्षेत्रात आणखी एका राष्ट्रीय संघटनेचा उदय इतकीच दखल त्याकाळी माध्यमांनी घेतली तर लाल झेंडा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या या क्षेत्रात संघवाल्यांचे काय काम ? अशा शब्दात प्रस्थापित अन्य साम्यवादी मातब्बर संघटनांनी हेटाळणी केली. परंतु या कुचेष्टेकडे दुर्लक्ष करत भारतीय मजदूर संघाने आपले कार्य सुरूच ठेवले व बघता बघता ही संघटना या देशातील क्रमांक एकची संघटना बनली. अर्थात प्रथम क्रमांक मिळवणे हे ध्येय नव्हते तर राष्ट्र पुनर्निर्माणाचे कार्य म्हणून एक वेगळा विचार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचावा याहेतूने सुरु केलेल्या कार्याच्या वाटचालीतील तो एक सहजसाध्य टप्पा होता. देशहितांतर्गत उद्योगहित व उद्योगहितांतर्गत कामगारहित असा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा एक वेगळा विचार स्व. दत्तोपंत ठेंगडीजींनी तेव्हा मांडला. १ मे या जागतिक कामगार दिनाऐवजी या विश्वाचा आद्य कामगार “विश्वकर्मा” याच्या जयंतीचा दिवस म्हणजे १७ सप्टेंबर, हा कामगारदिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह त्यानी धरला. लाल झेंड्याऐवजी भगवा झेंड्याचा अंगीकार करणाऱ्या भारतीय मजदूर संघाचा गेली अनेक वर्षे कामगार क्षेत्रातील हा प्रथम क्रमांक कायम आहे. आज ५००० हून अधिक संघटना व एक कोटीहून अधिक सदस्यसंख्या असा हा विस्तार असून हजारो पूर्ण वेळ व निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या अथक त्याग व परिश्रमामुळे कार्यविस्ताराची ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे.
स्व. दत्तोपंत ठेंगडीजी हे एक द्रष्टा कामगार नेता होते. वर्धा जिल्ह्यातील आर्वी नामक एका लहानशा गावात १० नोवेंबर १९२० रोजी त्यांचा जन्म झाला. बालवयापासूनच संघाशी संबंध आल्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे १९४१ साली त्यांनी प्रचारक म्हणून कार्यास सुरुवात केली. भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेपूर्वी कामगार क्षेत्राचा अनुभव यावा म्हणून त्यांनी आयटक व इंटक या संघटनांमध्ये कार्य केले. कामगार संघटन म्हणजे कामगारांच्या मागण्यांसाठी मालकाशी संघर्ष करणारे एक हत्यार असे स्वरूप त्या काळात कामगारांच्या मनात ठळकपणे ठसविण्यात आले होते. परंतु, अशा संघर्षामुळे ज्या समाजाला त्रास होतो त्याच समाजाचा आपणही एक घटक आहोत ही जाणीव त्यांनी कामगारांना करून दिली. राष्ट्र पुनर्निर्माणाचे कार्य हे समाजाच्या विविध घटकांना एकत्र घेऊन करावे लागणार होते व कामगार हा त्या समाजाचा एक घटक असल्यामुळे त्याचे हित हे समाजाच्या हिताच्या, देशाच्या हिताच्या आड येणार असेल तर ते काही काळ बाजूला ठेवावे लागेल हा धाडसी विचार त्या काळात मांडणे व रुजाविणेचे अवघड कार्य स्व. दत्तोपतांनी मोठ्या कुशलतेने केले. अन्य कामगार संघटनाचा दृष्टीकोण याला ते “ब्रेड बटर ट्रेड युनियन” म्हणत व त्यापासून वेगळा दृष्टीकोण मांडतांना कोणत्याही राजकीय पक्षाची बटिक न बनता आपले संघटन हे एक “जेन्युइन ट्रेड युनियन” म्हणून कामगार क्षेत्रात ओळखले जाईल अशी कार्यरचना, रिती-नीती त्यानी संघटनेत रुजवली.
काळाच्या पुढे पाहू शकणारा या व्हिजनरी व दृष्ट्या नेत्यांने कामगार क्षेत्रात डाव्या चळवळीचा, साम्यवादी विचारांचा प्रभाव असतांना १९८१ मध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले कि डाव्या विचारांच्या संघटना व साम्यवाद यांच्या विरोधात काम करण्यात आपली शक्ती वाया घालवू नका कारण कम्युनिज्म संपणार आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असलेला हा नेता उर्दुचाही जाणकार होता. आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना एखादा मुद्दा प्रभावीपणे पटवून देताना ते देश विदेशातील घटनाचे ऐतिहासिक दाखले अगदी सहजपणे देत असत इत त्यांचा अभ्यास होता. गेट करार, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटना यांच्या आडून होणार्या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या धूर्त आक्रमणाच्याविरोधात कामगारांबरोबरच शेतकरी, विद्यार्थी व ग्राहक यांची अभेद्य एकजूट उभे करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. देशाला आर्थिक पारतंत्र्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई लढावीच लागेल हा आग्रह धरतांना त्यासाठी स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून व्यापक चळवळ त्यांनी यशस्वीपणे उभी केली.
स्व. . दत्तोपतांविषयी लिहू तेव्हडे थोडेच आहे. आज म्हणजे १४ आक्टोबर, त्यांना आपल्यातून जाऊन १३ वर्षे पूर्ण झाली परतु, विपुल साहित्य, ग्रंथसंपदा, भाषणे या माध्यमातून व्यक्त केलेल्या विचारातून ते आमच्यात सदैव आहेत व पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देत राहतील असा दृढ विश्वास आम्हा लाखो कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
बिंदुमाधव भुरे, पुणे.
स न २, हिस्सा न १क+२ब/१, ओमकार कोलोनी,
विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस, वैविध्य नगरीजवळ,
कर्वेनगर, पुणे ४११०५२
९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०
Wednesday, August 23, 2017
बैलोबा
बैल
तुम्हाला कधीतरी किंवा तुम्ही कोणालातरी कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी नक्की झापले असणार - "काय लेका नुसता बैला सारखा काम करतोस, जरा डोक वापरायला शिक."
म्हणजे बैल डोक वापरत नाही पण भरपूर काम करतो किंवा डोक नाही म्हणून आम्हाला बैल म्हणत असावेत. आमची नावही अशीच ... कोणी ढवळ्या तर कोणी पवळ्या वगैरे. तुमच्यातही जर एखादा कोणी ढ किंवा मठ्ठ असेल तर त्याला गमतीने का होईना आमच्या नावाने म्हणजे ढवळ्या, पवळ्या अशी हाक मारता ना तुम्ही ?
पण माझा सांगायचा मुद्दा आज वेगळाच आहे. नुकताच तुम्ही आमचा वाढदिवस म्हणजे तुमच्या लेखी बैलपोळा साजरा केलात. बर वाटते हो एक दिवस काम न करता निवांत ! शिवाय त्या दिवशी कोडकौतुक होत ते वेगळच.
तुमच्यात नाही का बच्चे कंपनीचा वाढदिवस असला कि केक कापण असते, नविन कपडे, गोडधोड जेवण, बागेत फिरायला नाहीतर एखादा सिनेमा, संध्याकाळी घरी मित्रांबरोबर धमाल नंतर देवासमोर बसून औक्षण. हल्ली हे औक्षण वगैरे शहरातून क्वचितच दिसत म्हणा.
असो ... आमची पण शिंगे त्यादिवशी मस्तपैकी रंगवतात, रंगीबिरंगी कपड्यांची अंगावर झूल ! मालक फार हौशी असेल तर अगदी अंगावर रांगोळी काढली जाते. नेहमीच जेवण तर असतच, जोडीला पुरणपोळीही मिळते बर का ! मग वाजंत्री, ताशा बडवत गावातून मिरवणूक. मस्त वाटत, मज्जा येते. तिन्ही सांज झाली कि मग थोड उदास वाटायला लागते, दुसरे दिवशीची सकाळ दिसू लागते. परत मानेवर रोजच्यासारख जू ठेवून काम करायच, राबायच.
पण हे वाटणेही क्षणिकच बर का ! काम तर करायचच असत, अगदी भरपूर ! खर सांगायच तर हे अस एक दिवसासाठी सजून बसून रहायच, बसून आयत खायच म्हणजे कसतरी वाटते हो ! म्हणूनच या निमित्ताने आज मन मोकळ करतांना एक विनंती कराविशी वाटते आहे.
तुमच्याकडे बच्चे कंपनीच्या वाढदिवसाला तुम्ही विचारता कि नाही त्यांना कि "काय आणू तुला वाढदिवसासाठी ?" तस जर मला विचारले ना तर मी मात्र एक मनातली सुप्त इच्छा सांगणार आहे.
तुम्हा मंडळींना व्यायाम म्हणून रोज तासभर चालायच म्हटले तरी कंटाळा असतो. आणि समजा अचानक सांगितले कि उद्या मॅरेथाॅनमधे तुम्हाला धावायचे आहे. धावाल का ? नुसत्या कल्पनेने काटा येतो ना अंगावर.
जरा गाड्याला जुंपण्यापूर्वी एकदा आमच्या डोळ्यात बघा, कशाला कोर्टाच्या आदेशाची वाट बघायची ? जेव्हा गाड्याला जुंपून शर्यतीत धावायला लावता, कल्पना करा काय वाट लागत असेल तेव्हा आमची ? एकिकडे पोळ्याला लाड करायचे आणि दुसरीकडे ही क्रुरता ! थांबवता आल तर बघा, एक विनंती समजा. तशी बाकी आमची काहीच इच्छा नाही.
कोणत्याही शर्यतीत कधीही न धावलेला पण ज्यांचे आयुष्य हीच एक शर्यत आहे अशा तमाम बैलोबांच्या वतीने .....
बिंदुमाधव भुरे