Monday, December 30, 2019

पान उलटूनी ...

पान उलटूनी .... 

स्मार्ट फोनवर सतत बोट फिरवावीत. दर दोन मिनिटांनी काही नविन व्हॉटस अप आलय का बघाव ... नसेल तर फेसबूक इन्स्टाग्रामवर काही नोटिफिकेशन आलय का चेक कराव.... पण सतत तेच ते करुन बोअर झाल की मग वळाव मोठ्या पडद्याकडे अन् हातातल्या रिमोटच बटण दाबाव.... !

न्यूज चँनेलवर त्याच त्या बातम्या नाहीतर रटाळ कर्णकर्कश्श चर्चा .......! फिल्मी चँनल्सवर सतत चालणारे तेच ते सिनेमे नाहीतर साऊथच्या डब केलेल्या देमार फिल्म्स ! त्यामुळे वैतागलेल पब्लिक सतत नवनवीन पर्याय शोधत असतं. मोठ्या पडद्यावरील चँनेल्सच्या तुंबळ गर्दीत अँमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्सने इ. यांनी आपल बस्तान बसवलय अस वाटत असतांना वेब सिरीजच आगमन सांगून गेल कि येणारा जमाना आमचा आहे. 

मल्टिप्लेक्स, नाटक हा ऑप्शन म्हणजे खिशाला पाच सातशे रुपयाला चाट ! वीकेंडला मॉलमधल विंडो शॉपिंग टाईमपास ! पण खर सांगायच तर या सगळ्यातून मिळत काहीच नसतं .... मात्र .... हे अस्थिर मन अधिकच चंचल, अस्वस्थ होत चाललय अस आतून जाणवत ! केव्हातरी हे सगळे बंद करून मला नेमके काय हवय ? आणि मला नेमके काय आवडतय ? या दोन प्रश्नांचा शोध घेण्यासाठी डोळे बंद करून शांतपणे विचार करायला हवा .... हे एक प्रकारच मेडिटेशनच म्हणायच की !

अवती भवती नजर टाकली तर अस चंचल, अस्थिर, अस्वस्थ व अधीर असलेल समाजमन पहायला मिळत. या सगळ्या भाऊ गर्दीत पुस्तके आणि वाचन संस्कृती अडगळीत पडल्याची भावना एखाद्या निवांत क्षणी मनात अधिक दृढ होते. काय वाचाव .... ? ऐतिहासिक, ललित, सस्पेन्स थ्रिलर, अध्यात्मिक, विनोदी, कादंबरी, प्रवासवर्णन, लघुकथा कि नाट्यछटा ? काही ठामपणे सांगता येईल का कि आपल्याला वाचायला नेमक काय आवडतय ते ? 

शेवटच पुस्तक कोणत वाचल होत ? अस विचारल तर आठवणारही नाही. कदाचित पुस्तकाचा विषय अंधूक आठवेल पण नाव आठवणार नाही. पुस्तकाच नाव त्याचा विषय आठवला तर कदाचित लेखकाच नाव आठवणार नाही.... ! हे अस होणही आता अंगवळणी पडत  चाललय. 

नविन वर्षात मनाची चंचलता, अस्वस्थता संपवायची ! हे "पान उलटवून" पुढच्या पानावर नविन सुरवात करायची.... विषय अगदी कोणताही असो ... एक पुस्तक नेटाने वाचून संपवेन असा संकल्प करायचा. आजवर प्रत्येक वर्षी नविन वर्षाचा संकल्प केला असेल. तो पूर्ण झालाय किंवा कस याचा हिशोब नको आता मांडायला, नाहीतर या संकल्पाचही तसच व्हायच. त्यामुळे हा वाचन-संकल्प मात्र जानेवारीतच पूर्ण करायचा !  

संकल्पातला पुढचा भाग महत्वाचा ! वाचलेल्या पुस्तकाचे नाव अन् त्याबद्दल मला काय वाटल ? यावर जमतील तशा दहा बारा ओळी आपल्या शब्दात लिहून आपण सोशल मिडियावर व्यक्त व्हायच. नाहीतरी सोशल मिडियावर फालतूगिरी आपण बऱ्याचदा करतच असतो. मग अतिरेक झाला कि याच सोशल मिडियावर चालणाऱ्या फालतुगिरीला शिव्या घालत बसतो. पण नविन वर्षात याच प्लँटफॉर्मचा अशा पोस्ट टाकून छान वापर करायचा ! 

आपल्या फेसबुक, व्हॉटस् अप ग्रुपवरील दोस्तांना आपली ही पोस्ट वाचून ते पुस्तक वाचाव अस वाटल पाहिजे. आपण सगळ्यांनी अशा पोस्ट टाकायच ठरवल तर फेब्रूवारीत आपल्याला अशा असंख्य वाचनीय पुस्तकांविषयी माहिती मिळावी. त्यातली काही जमतील तशी विकत घ्यावी व वाचून पुनः पुनः व्यक्त होत रहाव .... आपल्या सोशल मिडियावरच्या जगतात आपल्या ग्रुप्सचा साहित्यिक कट्टा आपणच तयार करायचा ! सगळ्यांना सगळी पुस्तक विकत घेण जमेलच अस नाही पण आपसात एक्स्चेंज तर नक्कीच करता येतील ! 

चला तर मग आपल्या सवयींच "पान उलटूया", टीट्वेंटी वर्षात आपल्या सवयीत "बीस-उन्नीस"चा तरी फरक करुया, आपल बुक शेल्फ समृद्ध करुया ! आपण सगळ्यांनी ठरवल तर ते सहज शक्य होईल. मग करताय संकल्प दरमहा एक पुस्तक वाचनाचा ? 

नविन वर्षाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ! 💐💐

© बिंदुमाधव भुरे, पुणे. 
८६९८७४९९९०/९४२३००७७६१
bnbhure@rediffmail.com

Friday, December 20, 2019

मेंटेनंस कि रिपेयर

मेंटेनंस कि रिपेयर

रस्त्यात बंद पडलेली स्कूटर ढकलत गँरेजपर्यंत न्यावी कि मेकँनिकला फोन करावा या विवंचनेत दिग्या होता. त्याचा नेहमीचा गँरेजवाला त्याच्या घराजवळ होता. खर तर तो त्याचा बालमित्रच ! कॉलेजमधेही दोघे एकत्र होते. बीकॉम नंतर त्याने सरळ गँरेज टाकल. नोकरी करायची नाही हे त्याच पक्क ठरलेल. यंत्र, त्याची डिझाईन्स, मेकँनिझम यातच तो सदैव रमलेला असायचा ! अनेकदा दिग्या निवांत टाईमपास गप्पाला त्याच्या गँरेजवर बसायचा. 

पुढच्या चौकात एक गरेज होते.  तेथपर्यंत गाडी ढकलत न्यायलाही काही प्रॉब्लेम नव्हता. पण तिथला मेकँनिक लगेच गाडी पाहिलं का ? अमुक पार्ट गेलाय, तमुक पार्ट गेलाय, हे बदलायला लागेल ते बदलायला लागेल असल काही त्याने सांगितल तर ? दिग्याला एकदम इनसिक्यूअर वाटून गेल. शेवटी रस्त्याच्या कडेला स्कूटर लावून दिग्याने गँरेजला फोन केला.

 “हँलो” .. “हा बोला साहेबा, काय पडली का बंद परत?” पलीकडून हसत एमडी चा आवाज. मंगेश ढोमणे ! त्याच्या गरेजचे नावही एमडी ऑटो असेच होते. 

“होना यार ! हल्ली वारंवार अस होतय. जरा बघशील नीट या वेळी. लागेल तर एक दिवस गाडी ठेव गँरेजला” दिग्या बोलला. 

“गाडीची किल्ली सोडून जा, बघतो काय झालय ते अन् संध्याकाळी सांगतो” एमडीचे उत्तर !

दिग्या संध्याकाळी गँरेज वर हजर ! एमडीने एस्टिमेट तयार ठेवल होत. आकडा वाचून दिग्याची बोलती बंद झाली. तो एमडीकडे व कागदाकडे आळीपाळीने नुसता पाहत होता. “मंग्या लेका चेष्टा करतोस का ? इतके एस्टिमेट ? अरे साधी स्कूटर आहे लेका, चार चाकी नाही.” एमडीने हातातले काम बाजूला ठेवले. "कोयलेकी दलालीमे हाथ काले होते है" या डायलॉगला लाजवतील असे ऑइलचे काळे हात त्याने त्याच रंगाच्या कळकट कापडाला पुसले. हात स्वच्छ झाले कि कापड आणखीन काळ झाल ? हा संशोधनाचा विषय ठरावा. तो दिग्याजवळ आला. गँरेजाच्या कोपऱ्यात त्याचे टेबल होते. त्याकडे हात करत म्हणाला “ये, बसून बोलूया”

एस्टिमेटचा कागद हातात घेत मग एमडी दिग्याला समजावून सांगू लागला. “स्कूटरचे दोन पार्ट बदलायला लागणार आहेत कारण हे रिपेयर होऊ शकत नाहीत अन् ऑईल लिकेजमुळे पूर्ण इंजिन डाऊन करून सर्विसिंग कराव लागणार आहे. आणि याला काहीच पर्याय नाही. तुझ्यासाठी दिग्या, लेबर चार्जेस कमी लावेन पण स्पेयर्सचे चार्जेस ? ते कसे टाळणार ?" 

"पण हे अचानक अस का झाल ? स्कूटर चालवतांना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता ?" दिग्याने भाबडेपणाने बोलला. दिग्याकडे दिवसभरात येणाऱ्या ग्राहकात व्हरायटी भरपूर होती. बहुसंख्य लोक "तात्पुरत काही तरी करुन गाडी सुरु करुन द्या. मग नंतर टाकतो रिपेयरिंगला" अस म्हणणारे किंवा "पुढच्या सर्व्हिसिंगला करु" अस म्हणणारे. अशा ग्राहकांना एमडी प्रवचन द्यायचा. तो जे काही बोलायचा ते ज्ञान त्याने कुठून पैदा केल असेल ? हा प्रश्न कोणालाही पडावा. टाईमपास गप्पांना आलेल्या दिग्याच्या कानावरही ही प्रवचने अनेकदा पडलेली ! पण तेवढ्यापुरतीच ! मेंदूत शिरायचा रस्ता बहुतेक बंद असायचा.  

आज ते एस्टिमेट पाहून दिग्याचा तो बंद रस्ता ओपन झाला होता. एमडी बोलत होता. "अस अचानक वगैरे काही होत नसत दिग्या ! आपण कॉमर्स ग्रँज्युएट. अकाऊंटस् शिकतांना बँलन्सशीट शिकलो. एखादा प्रॉब्लेम सोडवतांना बँलन्सशीट टँली करायच तर त्या प्रश्नात खाली दिलेली प्रत्येक "अँडजस्टमेंट" बारकाईने वाचावी लागते. आयुष्याच्या बँलन्सशीटमधे मात्र अशा "अँडजस्टमेंट" आपण डोक लावून कधीच सोडवत नाही तर त्या अँडजस्टमेंटशी "कॉम्प्रोमाइज" करुन मोकळा होतो."

दिग्याच्या चेहेऱ्यावर भल मोठ प्रश्नचिन्ह ... "म्हणजे काय ? मी नाही समजलो" इति दिग्या ..

"आता हेच बघ ना ... ब्रेक लूज झाले असतील, नीट लागत नसतील तर आतले ब्रेकशू बदलायला पाहिजे अस आम्ही सांगतो. ब्रेकशू बदलणे ही "अँडजस्टमेंट" सोडवली कि स्कूटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह ... अँक्सिडेंटचा धोका कमी ... ! पण गिऱ्हाईक म्हणतात ब्रेक तात्पुरते टाईट करुन द्या. हे झाल "कॉम्प्रोमाइज" ! "अँडजस्टमेंट" शब्दाच्या डिक्शनरी अर्थामुळे दिग्याचा उडालेला गोंधळ जरा क्लियर झाला." 

एमडीच प्रवचन कंटीन्यू ...  "बँलन्सशीट शिकतांना रिपेयर्स अँड मेंटेनन्स हा आयटेम आठवतोय का रे दिग्या ? तेथे हे दोन्ही शब्द एकत्र असतात अगदी राम लक्ष्मणासारखे ! पण आयुष्याच्या बँलन्सशीटमधे मात्र या दोन शब्दांना वेगवेगळे करायला हव. कारण वेळच्या वेळी नियमित “मेंटेनन्स” केला नाही तर “रिपेयरी”चा मोठा खर्च अंगावर पडतो. कित्येक कंपन्यात हल्ली AMC - ANNUAL MAINTAINANCE CONTRACT असते बघ ! तुमच्या SYSTEM ला, मशीनला काही प्रॉब्लेम असो अगर नसो, नियमित कालावधीने त्याची देखभाल केली तर दीर्घकाळ त्या विनातक्रार काम करतात.”

“पण अगदी तुझ्यासकट अनेक मंडळी नियमित मेंटेनन्सचा खर्च वाचवायला बघतात अन स्कूटर बंद पडल्यावरच येता त्यामुळे तुम्हाला रिपेयरीचा मोठा खर्च तर करावा लागतोच शिवाय ऐनवेळी होणाऱ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते ते वेगळेच ! दिग्या लेका, तुला यापूर्वी मी अनेकदा सांगितले कि दर सहा महिन्यांनी किंवा साधारण दोन हजार किलोमीटर रनिंग झाले कि स्कूटर आणत जा. त्या वेळेला किरकोळ मेंटेनन्स खर्चात काम होते आणि गाडी पण नीट रहाते. दिग्या लेका, आपली गाडी तिच्या भाषेत केव्हातरी सिग्नल देत आपली तक्रार सांगत असते. आपण ते लक्षात घ्यायला हव यार." 

दिग्या मान डोलवत दाद देत होता.  दिग्या हा एमडीचा खास दोस्त असल्यामुळे एमडीने आणखी पुढचा गियर टाकायच ठरवल "आपल्या शरीराचेही तसेच आहे दिग्या !सर्दी पडस झाल, किरकोळ ताप आला तर आपण डॉक्टरकडे न जाता बऱ्याचदा दुखण अंगावर काढतो. एखाद्या वेळी हे ठीक आहे पण ही सवय लागून जाते आपल्याला ! थकवा येणे, छातीत कळ येणे, अकारण घाम येणे, डोके सतत जड होणे, अकारण चक्कर येणे यासारख्या माध्यमातून आपल शरीरही सिग्नल्स देत असते. त्याकडे दुर्लक्ष करुन कस चालेल ?  नियमितपणे म्हणजे वर्षातून एकदा संपूर्ण हेल्थ चेक अप करणे हे पण मेंटेनन्स सदरात मोडते. शेवटचा हेल्थ चेक अप कधी केला आहेस ? काही आठवतय का ?” दिग्या मंदसा हसला व मान आडवी हलवत नाही म्हणाला.

एमडीने मग आणखी पुढचा गियर टाकला .. “गाडीत टाकलेल्या पेट्रोलमधे भेसळ असली की स्कूटर इंजिन कुरकूर करते ना ? आपण लगेच तो पेट्रोल पंप अव्हॉइड करतो. पण तब्येत बिघडू नये म्हणून आपण तसेच कॉशस का नसतो ? फास्ट फूड, जंक फूड. चायनीज ... हे एक प्रकारे भेसळयुक्त इंधन आहे की रे !  “आपल्या इंजिनावर” त्याचा काय परिणाम होतो याचा विचार आपण कधी करणार ? टायरच एयरप्रेशर तर आपण कधी चेकच करत नाही. डायरेक्ट पंक्चर झाली कि मगच तपासायच ! तसच ब्लडप्रेशरच आहे. चक्कर आली, अंधारी आली, गरगरतय म्हटल कि डॉक्टरकडे ! तिथेच बीपी चेक होणार."

एमडीने आता टॉप गियर टाकला होता  "थोडा नीट विचार करुन बघ ... आता विषय निघालाय म्हणून सांगतो .. आज रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करून विषारी झालेल्या जमिनीतून पिकणाऱ्या धान्यात सत्व असत का ? धावपळीच्या जीवनात वेळेअभावी जे झटपट मिळेल त्या खाण्यात पोषण मूल्य असतात का ? मग आपण भेसळीचा पेट्रोल पंप टाळतो तसे हे असले खाणे का टाळत नाही ? बँलन्स्ड डाएट ठेवला व जोडीला उच्च दर्जाच्या फूड सप्लीमेंटची जोड दैनंदिन आहारात दिली तर आपले इंजिन कुरकुर करणार नाही. हा खर्चही दिग्या आजकाल मेंटेनन्स सदरात मोडतो. हा ...  पण याच्या जोडीला रोज अर्धा तास व्यायामाला द्यायला हवा बर का ! गाडी सुरु करण्याआधी नीट फडक मारुन गाडी पुसतो न आपण तसच समज हव तर !”  

"दिग्या, हल्ली गाडी जुनी झाली कि एक्स्चेंज ऑफरमधे नविन आणतात. बाकी गोष्टींबद्दल तर बोलणच नको. यूज अँड थ्रोचा जमाना आहे. पण आपल तस नाही ना रे ! आपल्या शरीराच एजिंग सातत्याने सुरु असते. ते कोणाला चुकलय ? पण हे एजिंग हेल्दी ठेवल तर आपल इंजिन स्मूथ चालणार अगदी विनातक्रार ! किरकोळ तक्रारी नियमित मेंटेनन्समधे निघून जातात. वय वाढेल तस मेंटेनन्स खर्चात वाढ करत राहिल पाहिजे."

दिग्याला एमडी आज भलताच जिनियस वाटला. नट, बोल्ट, इंजिन, मेकँनिझम यात रमणाऱ्या मंग्याला "मेकँनिक संत गुरु" पदवी त्याने मनोमन बहाल केली होती. मशिन्स व त्यांचे डिझाईन याच्या अभ्यासाचा छंद असणाऱ्या एमडीने हे ज्ञान कुठून पैदा केल असेल ? हे एखाद्या टाईमपास गप्पात जाणून घ्यायच त्याने ठरवल होत.

"उद्या संध्याकाळपर्यंत होईल ना गाडी ?" दिग्याच्या टोनवरुन दिग्या कंन्व्हिन्स झालाय हे कळत होत. एमडी म्हणाला "ट्राय करतो. बहुतेक होईल. पण एक दिवस ट्रायलसाठी ठेवतो. वापरुन पाहीन, काही प्रॉब्लेम नाही याची खात्री पटली कि फोन करतो"!

"म्हणजे "आयसीयू तून बाहेर आणल कि एक दिवस आब्झरवेशन आणि नंतर डिस्चार्ज .. असच ना ?" दिग्याने हसून आंगठा दाखवत बोलला आणि थंम्स अप खूण करत मंग्याला दाद दिली. 

©बिंदुमाधव भुरे, पुणे.
९४२३००७७६१/८६९८७४९९९०