Sunday, March 6, 2022

अर्धवटराव

काल पुणे मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अर्धवट कामाचे उद्घाटन, रविवारी मुलांना शालेय युनिफॉर्ममधे आणल, मोबाइलवरून तिकिट काढणे यासारख्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी पं. मोदींना घेरण्याचा, त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. 

प्रत्यक्ष कार्यक्रमाला राष्ट्रवादी तर्फे अजितदादा उपस्थित होते पण पालकमंत्री या नात्याने त्यांचे भाषण विकासकामे आणि राज्यपाल याभोवती आडमार्गाने घुटमळत राहिले. सेनेच्या वतीने सुभाष देसाई व एकनाथ शिंदे हजर होते मात्र पत्रकारांसमोर अगर सोशल मिडियात त्यांच्या प्रतिक्रिया आढळल्या नाहीत. कदाचित् बोलण्यातील एकाधिकारशाही सध्या सेनेत सुरु आहे त्याचा परिणाम असावा. 

कालचा पुण्यातला पंतप्रधानांचा कार्यक्रम हा संपूर्ण विकासकामांशी निगडित होता. त्यांचे उद्बोधनही विकासाची दूरदृष्टी आणि विकासकामांच्या परिसीमांच्या विस्ताराची व्याप्ती दर्शविणारे होते. 

शेवटी हे राजकारण आहे आणि हे युग, जमाना आहे मार्केटिंगचा ! ज्यांना ज्यांना त्यांच्या काळात हे जमल नाही त्यांना पोटदुखी होणे यात नवल ते कसले ? ज्या मुलांना पंतप्रधानांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली त्यांना, त्यांच्या पालकांच्या मनात आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना असणार ! रविवारी सुटी असतांनाही शाळेचा युनिफॉर्म घातला कारण शालेय मुलांशी संवाद साधायचा आहे हे दाखवून द्यायचे होते. 

हल्ली तर एखाद्या हाउसिंग प्रोजेक्टमधील फ्लॅट बुकिंग सुद्धा सॅम्पल फ्लॅट दाखवून करतात.‌ अर्धवट कामाचे उद्घाटन म्हणून टीका करणारा मनोमन जाणून असतो कि हे पुणे मनपा निवडणुकीसाठी नारळ फोडणे आहे आणि म्हणून ही पोटदुखी ! पण ट्रायल रन केव्हा करतात हो ? प्रोजेक्ट अर्धवट असतांना ? आणि तेव्हा काही जणांनी उभ्याने प्रवास करतांनाचे फोटो व्हायरल केले ते निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच ना ? 

संघ प्रचारक म्हणून चार दशकांहून अधिक काळ पार्श्वभूमी असली तरी राजकारणात प्रवेशाला जेमतेम दोन दशके पूर्ण झालेली व्यक्ती राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नसताना संपूर्ण बहुमताचा सलग ३ टर्म मुख्यमंत्री आणि दोनवेळा पंतप्रधान होते. यावर ६ दशके आणि उभी हयात राजकारण करणारा पण एकदाही स्वबळावर सत्ता मिळवू न शकलेला टीका करतो तेव्हा या पोटदुखीला ना औषध लागू होते न कोणता डाॅक्टरी इलाज ! 

शरदोध्वव तथा संजयप्रेमींनी राग मानू नये. राहिला प्रश्न सोनियांच्या राहूलचा ! तर तो शर्टावरुन घातलेल जानवं शोधतोय ! तेव्हा तुर्तास नानांवर समाधान मानून घ्यावे. रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या मधला अर्धवटराव अशा वेळी सहजच आठवून जातो.
😀😀😂😂

© बिंदुमाधव भुरे, पुणे