Saturday, August 17, 2019

श्री निलेश चव्हाण - बायोडेटा

श्री निलेश चव्हाण यांचा बायोडेटा

1. जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती यशाची विविध शिखरे पादाक्रांत करत असतांना दरवेळी  एक नवा कीर्तिमान प्रस्थापित करत असते कारण अशा माणसाची स्पर्धा हे नेहमी स्वत:शीच असते. यशाचा असा सदैव चढता आलेख सांभाळताना यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणे हे खूप थोड्या जणांना जमते व अशा मोजक्या व्यक्तींमध्ये स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री निलेश चव्हाण यांचे नाव सन्मानाने घ्यावे लागेल.

2. कोकण किनारपट्टीवरील चिपळूण जवळील एका छोट्याशा गावातील कै. शंकर चव्हाण हे निलेशजींचे वडील ! कै शंकरराव एक उत्तम प्रथितयश शिक्षक होते. गरिबीचे चटके सोसलेल्या शंकररावांना शिक्षणाचे महत्व ज्ञात होते त्यामुळे त्यानी या पेशाकडे व्यवसाय म्हणून कधीच पाहिले नाही. गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चाकोरीबाहेर जावून त्यांने सदैव मदत केली व असे शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये सन्मानाचे जीवन व्यतीत करत आहेत.

3. अशा संस्कारात वाढलेल्या निलेशच्या प्रतिभेला बहर न फुटता तर आश्चर्य ! काहीतरी वेगळे करायचे हे स्वप्न उराशी तेव्हापासून त्याने बाळगलेल होत. लौकिक अर्थाने शिक्षण संपवून १९९३ साली सिविल इंजिनीयारींगचा डिप्लोमा घेतला व त्यांचा उमेदवारीचा काळ सुरु झाला. इंडस्ट्रीयल कंस्ट्रक्शन विभागात विशेष प्राविण्य मिळविण्याच्या दृष्टीकोनातून या व्यवसायातील खाचा खोचा समजून घेण्यासाठी उमेदवारीचा हा काळ आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा कालखंड होता असे ते मानतात कारण याच काळात त्यांच्या मनात दडलेल्या व्यावसायीकाच्या महत्वाकांक्षांना अंकुर फुटण्यास आरंभ झाला आणि ....

4. २००७ साली स्कॉन प्रोजेक्ट ही कंपनी अस्तित्वात आली. औद्योगिक बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकल्यावर पहिल्याच वर्षी कंपनीची उलाढाल ही ₹ ३ कोटी इतकी होती तर आज एक तपानंतर व्यवसायाने ₹ ३०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. आरंभी जेमतेम १५ कर्मचारी असलेल्या स्कॉनच्या कुटुंबाची संख्या आज ४०० हून अधिक आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे मूल्य ₹ ५ कोटी इतके आहे. गगनभरारी मारणाऱ्या स्कॉन प्रोजेक्ट्सचा गेल्या तीन वर्षातील एकत्रित व्यवसाय हा ₹ ७२६ कोटी इतका आहे. औद्योगिक बांधकाम क्षेत्रातील गेल्या २५ वर्षांच्या श्री निलेश सरांच्या अनुभवातून आज अखेर २५० हून अधिक प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. व्यवस्थापकीय कौशल्य, माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी याबरोबरच अनेकांसाठी ते स्फूर्तीस्थान व प्रेरणा स्रोत राहिले आहेत. 

5. आपल्या कामात नीती मुल्यांची जोपासना करतांना व्यवसायाला अधिकाधिक स्पर्धात्मक रूप देत कंपनीतील तसेच साईट वरील ... प्रत्येक कर्मचारी, कामगार याला त्यानी आपल्या कुटुंबातील एक घटक मानत माणुसकी सदैव जपली. कामाच्या दर्जाबद्दल कधीच कोणतीच तडजोड त्यांना मान्य नाही. यासाठी प्रसंगी “वज्राहुनी कठोर” अशा रूपाचे दर्शन देतांना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे निलेश सरांविषयी प्रत्येकाच्या मनात प्रेम, आपुलकी याच बरोबरीने आदरयुक्त दरारा राहिला आहे. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम तेच द्यायचे हा जणू कंपनीचा अलिखित नियम त्यांनी बनवून टाकला. यासाठी कार्पोरेट जगतात असलेली ठराविक कार्यालयीन पदरचना ज्याला हायरारकी म्हणतात त्याच्या सीमा ओलांडून प्रत्येकाला आपल्या केबिनमध्ये मुक्त प्रवेशाचे धोरण त्यांनी राबविले आहे. “किंमत, दर्जा आणि वेळ” ही त्रिसूत्री कधीच नजरेआड होणार नाही याची ते स्वत: दक्षता घेतात व त्याबरोबरच “सुरक्षा” या चौथी महत्वपूर्ण कडीची त्याला जोड त्यांनी दिली. साईटवर कोणताही अपघात किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून प्रत्येकाला नियमितपणे प्रशिक्षणाचे धोरण त्यानी राबविले आहे.   

6. सामाजिक बांधिलकीचे भान त्यांच्यातील सहृदयी माणसाने सदैव जपले. पिरंगुट भागातील अनेक विद्यार्थी यांना तसेच अनेक गरजवंतांना त्यांनी मदतीचा हात दिला. २०१४ साली गरीब व गरजूंना मोफत डायलिसीस करता यावे यासाठी डायलिसीस मशीनची सुविधा त्यांने उपलब्ध करून दिली. कंपनीतील कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा आदर्श पायंडा निलेश सरांनी पाडला व त्याच बरोबर कंपनीतील प्रत्येकाचा वैयक्तिक, ग्रुप तसेच अपघाती विम्याचा खर्च हा कंपनीमार्फत करण्याची परंपरा त्यानी सुरु केली.

स्थापनेनंतर अवघ्या ५ वर्षात स्कॉन प्रोजेक्ट या ब्रँडची दखल औद्योगिक विश्वाने घेतली व

• २०१२ साली स्कॉनला पहिला पुरस्कार मिळाला तर आज अखेर स्कॉनच्या नावावर एकूण १५ पुरस्कारांची नोंद आहे.

• यात Birla Super Award २ वेळा,

• उत्कृष्ट दर्जासाठी  MSME Award, 

• सुरक्षेशी संबंधित PCERF safety Award लागोपाठ ३ वर्षे, 

• पर्यावरणाशी संबंधित CIDC Green Rating Award,

• अंतरराष्ट्रीय स्तरावरील  Asia’s Most Admired Award व

• नुकताच मिळालेला Bharat Nirman Award या पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

या शिवाय

• २०१४ साली बांधकाम व्यावसायिक संघटनेकडून YOUNG ENTREPRENEUR AWARD ने तर

. २०१५ साली त्यांना NRI FOUNDATION कडून  HIND RATTAN AWARD ने सन्मानित करण्यात आले.

• याच वर्षी ALL INDIA ACHIEVERS FOUNDATION ने त्यांना OUTSTANDING ACHIEVEMENT AWARD FOR INFRASTRUCTURE DEVELOPMENT प्रदान केले.

• २०१६ साली सिंगापूरच्या  BUSINESS EXCELLENCE & RESEARCH GROUP ने त्यांना  YOUNG ACHIEVER OF THE YEAR ICON OF SPACES या पुरस्काराने गौरविले

• तर याच वर्षी  पुन: एकदा ALL INDIA ACHIEVERS FOUNDATION ने INDIAN LEADERSHIP AWARD FOR CONSTRUCTION AND DESIGN साठी त्यांची निवड केली.

• या वर्षी म्हणजे २०१६ साली  MAHARASHTRA INDUSTRIAL & ECONOMIC DEVELOPMENT ASSOCIATION ने त्यांना  MAHARASHTRA BUSINESS EXCELLENCE AWARD प्रदान केला.

• यशाची ही कमान २०१७ आणखी उंच होत गेली या वर्षी त्यांना पुन: ३ पुरस्कार मिळाले. यात पहिला होता तो MAHARASHTRA INTERNATIONAL BUSINESS ASSOCIATION यांच्या कडून मिळालेला MARATHA BUSINESS EXCELLENCE AWARD 

• तर दुसरा होता ROTARY INTERNATIONAL द्वारे दिलेला ROTARY INTERNATIONAL VOCATIONAL EXCELLENCE AWARD.

• तिसरा पुरस्कार MCCIA द्वारे FIRST GENERATION SUCCESSFUL ENTREPRENEUR साठी  देण्यात आलेला MCCIA INNOVATION & ENTREPRENEURSHIP AWARD LATE SHRI KIRAN NATU UDYOJAKTA PURASKAR दिला गेला.

• २०१८ साली शिरपेचात मनाचा आणखी एक तुरा खोवला गेला. सिंगापूर येथील WHITE PAGE INTERNATIONAL याच्यातर्फे ASIA’S MOST ADMIRED LEADER हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

• २०१९ साली औद्योगिक बांधकाम विभागात उत्कृष्ट कामगिरी व विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल हुशार व्यक्तिमत्वाला देण्यात येणाऱ्या BHARAT NIRMAN AWARD साठी त्यांची निवड झाली.