Saturday, July 27, 2019

गर्लफ्रेंड

*गर्लफ्रे़ड*

सध्याच लाईफ एकदम स्ट्रेसफूल ! हा स्ट्रेस सतत डाऊनलोड करत रहावा लागतो. त्यासाठी मग भरमसाठ टीव्ही चँनेल आहेतच. पण अस्थिर मन एका चँनेलवर सलग पाच मिनिट थांबेल तर शपथ ! तेच ते पिक्चर्स नाहीतर साऊथच्या हिंदी डब मुव्हीज ! तेही बोअर होतय म्हटल्यावर राहतय काय तर सिरियल्स ... त्या तर डोक्यात जातात. मग टाईमपास अन् विंडो शॉपिंगसाठी मॉलमधे जायच किंवा मल्टिप्लेक्स !

अस काहीस तुमच झालय आणि तुम्हाला डोक्याला शॉट नकोय का ? तर मग बिनधास्त जा आणि "गर्लफ्रेंड" पाहून या. *या पिक्चरच एक बरय .. काही शिकवायच्या किंवा सामाजिक संदेश द्यायच्या भानगडीतला हा पिक्चर नाही.* पिक्चरच्या नावावरुन "मॉम डँड" कँटेगरीनी नाक मुरडायच कारण नाही किंवा बँचलर्सनी हुरळूनही जायच नाही. कपल्सनी तर आपल्या मुलांसह बिनधास्त पहावा असा पिक्चर आहे. फेसबुक व सोशल मिडियाच्या प्रेमात असणारी तमाम मंडळी पिक्चर मधल्या हिरोशी कनेक्ट होतील. आयटीवाली मंडळी वीकेंडला गाडी काढून लाँग ड्राइव्हला जाणार, थंडगार बीयर, स्विमिंग पूलमधे रिलँक्स होत लाइफ मस्त एंजॉय करणार .. या कँटेगरीला तर आरशात पाहिल्यासारखच वाटेल ! पण बीयर, नॉनव्हेज मधले आम्ही नाही बुवा, आम्हाला आपल गरम कांदा भजी कॉफीतच मज्जा येते म्हणणाऱ्यांनी पण जरुर गर्लफ्रेंड पहावा.

पिक्चर सुरु झाल्यानंतर १५-२० मिनिटात नचिकेतचा लोचा प्रेक्षकांच्या लक्षात येतो. त्याच्या गर्लफ्रेंडच्या एंट्रीची उत्सुकता शिगेला पोहोचते आणि आलिशा उर्फ पायलची एंट्री होते. खरा पिक्चर इथून हालतो अन् प्रेक्षक एकदम इनवॉल्व होतात. *नचिकेतच कँरँक्टर एकदम बिच्चारा, पापभिरु दाखवलय ! इतक कि फक्त "मना सज्जना .... " मनाचे श्लोक म्हणायचा बाकी आहे. अमेय वाघ त्यात पूर्ण घुसलाय म्हणायला हरकत नाही*. तर आलिषा उर्फ पायल या कँरँक्टर थोड गुढतेच वलय देत ते कलेकलेने रंगवत नेलय. *सईने यात दिलेला परफॉरमन्स लाजवाब आहे. तिच्या भुमिकेला असलेल्या शेड्सची रेंज खूप वाईड आहे आणि या शेड्समधे रंग भरण्याचे काम तिने लिलया केलय. तिच्या डोळ्यातून व्यक्त होणारे भाव हे केवळ अप्रतिम आहेत. अनेक न लिहिलेले संवाद व प्रेक्षकांच्या मनात उमटत असलेले भाव ती केवळ डोळ्यांनी व्यक्त करते अन् त्यामुळे ती वेगळा ठसा उमटवून जाते.*

अमेय सईची अफलातून केमेस्ट्री म्हणजे गर्लफ्रेंड ! एखाद्या पिक्चर फ्रेम मधल्या मूळ ऑब्जेक्टवरील फोकस अधिक ठळक होईल याची काळजी त्याभोवतालच्या रंगसंगतीने येत असते तद्वत बाकी सगळ्या पात्रांच्या भुमिका मस्त जमून आल्या आहेत. गाणी अन् संगीत बद्दल मी म्हणेन "पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना" !  पण प्रेक्षकांना ही गर्लफ्रेंड नक्की आवडेल. पिक्चरची लांबी १०-१२ मिनिटे कमी होऊ शकली असती व त्यामुळे काही क्षण पिक्चर रेंगाळतोय किंवा स्लो झालाय हा विचार मनात आला नसता.

बिंदूमाधव भुरे, पुणे.

2 comments:

  1. Very nice analysis of the movie, we need such analysis of marathi movies, which is a common thing for Bollywood movies but not in case of marathi movies... good work sir..

    ReplyDelete
    Replies
    1. I was there for the Premier Show aa my son in law has contributed as Chief Assistant Director to it. Thank you for the compliment. I use to write free Lance & the articles are available on this blog.

      Delete