Saturday, February 20, 2021

बापाच काळीज

"बाबा, मी खेळायला जाऊ ?"
डिजिटल युगात टच स्क्रीनला चटावलेल्या पिढीतल एक निरागस पोर बापाला आर्जव करतय.  

समोरच्या लॅपीवर नजर रोखलेल्या अवस्थेत बाप नुसतच "हं" म्हणतो अन् पोरग .... ??? 
एकदाच वाचलेला धडा .. 
त्यावर गुरुजींनी विचारलेला प्रश्न ... 
टेंशन आलेल असतांना न अडखळता देता आलेल उत्तर ... 
आणि गुरुजींच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रीत मंद स्मित ...
हे पाहिल्यानंतर होणारा आनंद .‌.. 
आज बाबांनी "ह" म्हटल्यावर झालेल्या आनंदा एवढाच मोठ्ठा होता. 

आई मात्र किचन मधून ... 
"अरे, कशाला हो म्हटलं ? होमवर्क केवढा तरी राहिलाय त्याचा !"  .....
बहुतेक सगळ्या आया सेमच असतात नाही ? सेंचुरी ठोकलेल्या सचिन आऊट झाल्यानंतर "थोडा आणखी खेळायला हवा होता" म्हणणार ....  
१००% मार्क्स पडल्यावर ... आता हे टिकवून ठेवायचे बर का ? असे कौतुकाचे बोल आडवळणाने येणार ! .....
पोरगा खांदे उडवत बाबांकडे कटाक्ष टाकतो .. अन् डोळे मिचकावत त्यांना एक मिश्कीलपणे स्माईल देत बाहेर धूम ठोकतो.

चौथी आणि सातवीत स्काॅलरशिपला अट्टाहासाने बसवलेल असत ....  का ? तर १० वी चा पाया पक्का होतो म्हणे.....
पण मन कायम ओढ घेत असायच सोसायटीच्या आवारात पाट लावून उभा केलेला स्टंप, टेनिस बॉल, एकदम असली वाटेल अशी MRF CEAT वगैरेंचा स्टीकर लावलेली बॅट आणि फोर, सिक्स आऊटे या दंग्याकडे ... 

नववी संपतांना कळत कि यावर्षी मे महिन्याची सुटी  कुर्बान करायची.....
१० वीचा पाया आणखी पक्का करायचा असतो म्हणून ...
शाळेच्या उंबरठा पहिल्यांदा ओलांडला तेव्हा "मोठेपणी कोण होणार ?" घरी आलेल्या प्रत्येक आगंतुकाने विचारलेला प्रश्न ? ....
आणि चरकातून दहावेळा घातलेल्या उसाचा चिप्पाडा झाल्यागत दिलेल उत्तर .. "डाॅक्टर, इंजिनिअर, वकील !"
हे सगळ आजही कानात घुमतय ! 

खिन्न मन कायमच आक्रंदायच .....
"अरे, मला काय आवडते .. हे कधी कोणी विचारणार का ? 
एखाद्या वाढदिवसाला MRF स्टीकरवाली बॅट देत "जा बेटा, खेळ हवं तेव्हढ" असं कोणी म्हणेल ? ....्
पिक्चर संपतानाअमरीश पुरी तरी म्हणाला होता सिमरनला " जा बेटा, जी ले अपनी जिंदगी !" ...
नाही आपल्या नशिबी .... म्हणून तर बाबांनी त्याला आज "ह" म्हटलं नसेल ? 

या रेसमधे इच्छा नसली तरी माणूस ढकलला जातो, पायांचे तुकडे पडेपर्यंत धावत असतो.. बालपण आणि निरागसता कशाला म्हणतात हे तो जणू विसरुन गेलेला असतो. पण आज "बाबा, मी खेळायला जाऊ ?" यावर "ह" अस म्हणुन बाबा मूक संमती देतो तेव्हा त्या पोराच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद बाप तिरक्या नजरेने न्याहाळत स्वतःच बालपण तर त्यात शोधत तर नसेल ?

बापाने कायमच असल्या प्रश्नांचा कठोर सामना केलेला ! डोळ्यांच्या कडा पाणावल्या असे वाटायच्या आत 
"रडू नको मुलींसारख मुळुमुळू" 
म्हणुन करड्या शिस्तीचा बडगा उगारला जायचा. 
आज त्या आठवणींमुळे ओलावणाऱ्या कडा दिसू नयेत म्हणून तर आज "ह" असा प्रतिसाद बाहेर पडला नसेल ?

साॅफ्टवेअर इंजिनिअर होत त्यान बापाच स्वप्न पूर्ण तर केल पण त्यासाठी स्वतःच्या आयुष्यातले निसटलेले सुंदर क्षण मुलाच्या आयुष्यात देण्याचा प्रयत्न तो करत असावा.... 
वाळू मुठीत धरण्याचा केलेला प्रयत्न फसतो कारण वाळू निसटते. आयुष्यातील त्या क्षणांचेही असेच काहीसे असावे का ?  .....
त्यामुळे आता मुलाच्या आयुष्यातील असे क्षण ओंजळ धरुन जपण्याचा त्याचा प्रयत्न जणू काही .. 
एल आय सी च्या बॅनरवर "योगक्षेम वहाम्यहम" मधे ओंजळीने ज्योतीला सुरक्षित ठेवतात ... जणू तसा भासत होता ...

उतारवयात आधार असणारी हातातली काठीही हिसकावून घेणाऱ्या युगात पोरग आपली काठी बनून राहील ही अपेक्षा त्या "ह" मधे दडली तर नसेल ? 
बापाचे काळीज ... या काळजाला घरे पडली तरी याच्या मायेची पाखरण कधीच कळून येत नाही, उघड्या डोळ्यांना दिसत नाही .... 

पुष्पा, I hate tears म्हणणाऱ्या राजेश खन्नाच्या डोळ्यात तरंगणारे अश्रू पाहून शर्मिला त्याला प्रश्न विचारते तेव्हा नजर चुकवत तो सहज बोलून जातो "अरे ये आज बाहर कैसे आगए ?"  

पुरुष मंडळींच असंच असत काहीस !!! अव्यक्त अस अमरप्रेम ! 

(समस्त बाप जमातीला अर्पण)

©बिंदुमाधव भुरे, पुणे 
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

28 comments:

  1. नेहमी प्रमाणेच उस्फूर्त आणि तजेलदार!👌👌👍👍

    ReplyDelete
  2. याला अधिकांश पणे मागील पिढी जवाबदार आहे कारण आपण योग्य ते संस्कार मुलावर करू शकलो नाही

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम.

    ReplyDelete
  4. बिंदू खूप सुंदर लेख. मुलात आणि बापात दोन्हीत कुठे तरी स्वतः ला शोधले जाते.

    ReplyDelete
  5. विषयामध्ये सहजता !नेहमी अनुभवला येणारे अनुभव !पण मांडणी मात्र नीटनेटकी !मस्तच!

    ReplyDelete
    Replies
    1. सर, मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  6. सुंदर लिखाण. हं या शब्दाला किती महत्व आहे.
    होकारा चा हुंकार जगायला बळ देतं.

    ReplyDelete
  7. सुंदर लेख. बाप आणि मुलगा यांच्यातल्या हुंकराला शब्दबध्द छान केलंस.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  8. बापाला कळत असतं, पण जगात लढायला,पोराला सक्षम करण्यासाठी त्याला माहित असलेल्या मार्गावरच तो नेतो!अगदी थोडा अन्याय करूनही!!!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  9. खरंच मस्तं - - लिहीत रहा

    ReplyDelete
  10. Replies
    1. Thanks ! I will be happy to know your name.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. This comment has been removed by the author.

      Delete
  11. खूप छान नि हृदयस्पर्शी.असेच लिहित रहा.

    ReplyDelete