Friday, November 15, 2024

प्रतिडाव भाग २

 मित्रांनो,

येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच प्रसिद्ध झालेला माझा ब्लॉग  "प्रतिडाव  भाग १" आपण वाचलात. मला असंख्य प्रतिक्रिया आल्या. लेख आवडल्याचे नमूद करतांना बहुतेकांचा सूर .. "आमच्या मनातील भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या असाच होता." "महाराष्ट्राचे राजकारण हे खूपच खालच्या स्तरावर गेले आहे, सगळे जण एका माळेचे मणी आहेत"  तर अनेकजण अजितदादांना महायुतीत घेणे ही मोठी चूक होती असे अजूनही मानतात. पण फडणवीस म्हणतात तसे ती  "स्ट्रॅटेजिक अलायन्स" आहे हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही. असो !

मित्रांनो, राजकारणाचा स्तर खालावणे ही एक प्रक्रिया आहे. एका रात्रीत ते घडत नाही. दोन निवडणुकांमध्ये पाच वर्षांचा कालावधी असल्यामुळे या पाच वर्षांचा वापर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना  शह काटशह देण्यात खर्च करतात. या प्रक्रियेत राजकारणाचा स्तर खालावत जातो आणि समाजकारण दुर्लक्षित होते. निवडणुकांची चाहूल लागते तसे मग सत्ताधारी जागे होतात. लोकप्रिय निर्णय घेण्याची घाई केली जाते आणि विरोधी पक्ष त्याच मुद्द्यांचे राजकारण करत स्वतःचा अजेंडा मांडत कुरघोडीचे राजकारण खेळतात. गेल्या पाच वर्षात याचा आपण चांगलाच अनुभव घेतला. खर म्हणजे येणाऱ्या पाच वर्षांत जनतेचा पैसा कोणी ओरबाडायचा  याचसाठी निवडणूका आहेत का ? असा प्रश्न काही वेळा उद्विग्न मनात डोकावत रहातो.‌

प्रतिडाव भाग १ या लेखात सत्तेच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी केलेल्या विश्वासघाताचे आणि दगाबाजीचे राजकारण आणि त्याला दिले गेलेले प्रत्युत्तर यावर होता. तो भाग लिहित असतांनाच प्रतिडाव भाग २ चा विषय मनात आकाराला येत होता. त्या विषयाचा बाज वेगळा असल्याने तसेच त्यावर विस्ताराने भुमिका मांडता यावी म्हणून मुद्दाम हा वेगळा ब्लॉग लिहितोय.  

👇👇

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडी आघाडीच्या मंडळींनी "संविधान बचाव"चे एक नॅरेटिव्ह उघडपणे तर त्याच्या जोडीला मुस्लिम धर्माचे कार्डचा छुपा वापर केला. मुस्लिम धर्माचे कार्ड आजवर काॅंग्रेस पक्ष वापरत आला होता. गेल्या काही निवडणुकीत  विकासाच्या राजनीतीपुढे ते कार्ड निष्प्रभ झाले होते.  मात्र या निवडणुकीत हे कार्ड काॅंग्रेस पक्षाने नव्हे तर मुस्लिम समाजाने एकजूट दाखवत वापरले. अन्यथा संविधान बचाव आणि मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान यांचा आपसात काही संबंध नाही. पण मग तरीही मोदींचा "सबका साथ सबका विकास" हा मंत्र सोडून मुस्लिम मतदार भाजपच्या विरोधात एकवटला. 


वास्तविक काॅंग्रेस राजवटीच्या तुलनेत भाजपच्या राजवटीत हा वर्ग अनेक सोयी सुविधांचा, विविध योजनांचा लाभार्थी ठरला होता. मात्र तरीही अनेक मतदारसंघात मुस्लिमांनी एकगठ्ठा भाजप विरोधात मतदान केल. धुळे लोकसभा मतदार संघातील मालेगाव विधानसभा भागात झालेल्या मतदानाची आकडेवारी चित्र स्पष्ट करते.  लखनौ, वाराणसी, अयोध्या यासारख्या सुमारे ६० ते ७० मतदारसंघात असे एकगठ्ठा मतदान घडवून आणले गेले.  मुस्लिम समाजाने मग तो लाभार्थी असो नसो केवळ "भाजपला विरोध" या एकाच ध्येयाने एकगठ्ठा मतदान केले. म्हणूनच राजकीय परिभाषेत याला "व्होट जिहाद" अशी संज्ञा दिली गेली.

धार्मिक भेदभाव न करता "सबका साथ सबका विश्वास" हा मंत्र जागवत जनतेच्या जगण्याचा आणि जीवनाचा स्तर उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी गेली दहा वर्षे करत आहेत. मात्र आर्थिक अति मागासलेपण, अठरा विश्वे दारिद्रय असूनही दैनंदिन जीवनात धर्माला सर्वोच्च स्थान देणारा हा समाज "जन्नत" म्हणजे मरणोत्तर सुखाच्या कल्पनेने संपूर्ण आयुष्य हलाखीत (दोजखमध्ये) घालवतो. मुल्ला, मौलवी या धर्मगुरूंनी धर्मासाठी केलेल्या कोणत्याही आवाहनाला कोणतीही शहानिशा न करता प्रतिसाद देतो, जणू तो "त्या सर्वशक्तिमान"चा आदेश असावा. त्यामुळे दुःख, यातना सुसह्य करणारे जीवन देण्यासाठी झटणाऱ्या मोदींपेक्षा धार्मिक कार्ड खेळत समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करणाऱ्या काॅंग्रेसकडे हा मुस्लिम समाज सहजपणे ओढला जातो हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. "विकास कि धर्म ?" या प्रश्नावर त्या समाजाकडे कोणताही वैचारिक गोंधळ नाही. 

बेरोजगारी, गरीबी, महागाई वगैरे मुद्दे तर मुस्लिम समाजाला हिंदूंपेक्षाही अधिक तीव्रतेने जाणवणारे होते पण तरीही तो समाज सगळ्या योजनांचे लाभ कोणताही धार्मिक भेदभाव न करता मिळत असूनही धर्माच्या नावाखाली मतदान करताना एकजूट झाला. तीन तलाकवर बंदीची जखम अद्याप भरून निघालेली नसतांना श्रीराम जन्मभूमीचा निर्णय झाला, प्रत्यक्ष भव्य राममंदिर आकाराला आले, कलम ३७० गेल, आता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक येतय. या सगळ्याना चोख उत्तर म्हणून मुस्लिम समाजाने केलेल्या एकगठ्ठा मतदानाकडे पहावे लागेल.‌ कारण तशा प्रकारची जागृती, छुपा प्रचार त्यांच्याकडे केला गेलाय आणि तो सातत्याने सुरु असतो. हिंदू मात्र बेरोजगारी, महागाई, गरीबी, आरक्षण यांसारख्या मुद्द्यावर हिंदू विविध पक्षात विभागला गेलाय.‌ हे चित्र अधिक भयावह आहे, भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना करायला पुरेस आहे. 

बाबरीचे पतन आणि त्यानंतर उसळलेल्या  धार्मिक दंगली  यांचा इतिहास फार जुना नाही. एक "हिंदुहृदयसम्राट" म्हणून बाळासाहेबांचा दरारा त्यानंतर विलक्षण वाढला. किंबहुना भाजपपेक्षाही अधिक कट्टर आणि कडवट हिंदुत्व आचरणात आणणारे म्हणून हिंदू समाज त्यांना आणि शिवसेनेला ओळखू लागला. पाकिस्तान मध्येही त्यांचा नावाची सुप्त दहशत होती. मात्र केवळ मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हे कडवे हिंदुत्व काॅंग्रेसच्या दावणीला बांधले. धर्मांध मुस्लिमांना विरोध करणारा एक कडवट हिंदूंचा पक्ष म्हणून शिवसेनेची असलेली खरी  ओळख उद्धव ठाकरेंनी संपवली. आता हिंदुत्वाचा कैवार असणारा उरला केवळ भाजप. त्याच्या विरोधात धर्म म्हणून एकवटले कि काम फत्ते. याच विचारातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा समाज अधिक आक्रमकतेने, अधिक एकजूटीने मग इंडी आघाडीच्या मागे उभे  राहिला.‌ आज मुस्लिम समाजाचे ठेकेदार उघडपणे मविआलाच मतदान करा असा फतवा जारी करत आहेत. त्यासाठी २५०+ मतदार संघाची यादीही त्यांनी जाहीर केली आहे. या समाजाच्या दोन अडीचशे संघटना मुस्लिम मतदार यादीसाठी काम करत होत्या आणि आजही कार्यरत आहेत. 

सलग दोन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर काॅंग्रेसने "अभी नही तो कभी नहीं" या भावनेने २०२४ च्या निवडणुकीची तयारी केली होती. हिंदू मतविभाजनाची व्यूहरचना आखताना हिंदूंना जाती जनगणनेच्या सापळ्यात गुंगवून ठेवत समस्त हिंदूंना जातीपातीत विभागण्याचा डाव रचला. संविधान बचाव नारा बुलंद झाला. मागासवर्गीय, ओबीसी वर्ग बिथरला. या कपट, कूटनीतीमुळे काही प्रमाणात हा मतदार वर्ग भाजप पासून दूर गेला. आरक्षण,अडानी-अंबानी, बेरोजगारी, महागाई वगैरे मुद्दे शहरी निमशहरी हिंदू मतांची विभागणीसाठी वापरले गेले. याचा वापर आजही होतोय अन मतदारही त्या सापळ्यात अडकतोय. 

मात्र मुस्लिम मतदारांकडे वैचारिक संभ्रम नाही, ते एकजूट आहेत. त्यांना हिंदुत्ववादी भाजप नको आहे. त्यासाठी ते कोणाच्याही मागे उभे रहायला तयार आहेत. अगदी मनोज जरांगे पाटील यांच्याशीही त्यांची बोलणी झाली. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. या भेटीनंतर जरांगेनी "एकाच समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकता येत नाही असे सांगत" निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आणि यानंतरच २५०+ मतदारसंघात मविआ उमेदवारांना पाठिंबा देणारे पत्रक मुस्लिम संघटनेने जारी केलय. हा योगायोग नाही तर ही "सोची समझी साझिश"आहे. जरांगेंनाही भाजपला पाडायचे आहे आणि मुस्लिमांनाही भाजप नकोय. एकाच कारण आरक्षण तर एकाच हिंदुत्वाला विरोध !

दर पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत येणारे मुद्दे सगळे तेच आहेत. इंदिरा गांधी यांनी "गरीबी हटाव" दिला त्याला चार दशके उलटली. राजीव गांधी हे पंण "हमे गरीबीसे लडना है" म्हणायचे. हा चुनावी जुमलाच होता ना ? कारण गरीबी आणि गरीब आहे तिथे आणि आहे तसेच आहेत. आज त्या "गरीबी हटाव" घोषणेच रिपॅकिंग झालय आणि त्याला लेबल लागलय "जाती जनगणना" या नावाचे ! 

यात आता हातात संविधान प्रत नाचवत जातवार वर्ग युद्धाची ठिणगी पाडायचा काॅंग्रेसचा डाव आहे. ध्येय एकच हिंदू मतांचे विभाजन ! हा देश एक शक्ती म्हणून उदयाला येऊ नये असे वाटणाऱ्या जगात अनेक ताकदी आहेत आणि त्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काॅंग्रेस पक्ष सोयीचा वाटतोय. काॅंग्रेस गेली दोन टर्म सत्तेबाहेर असल्यामुळे जागतिक पटलावर कार्यरत असणाऱ्या या शक्तींच्या खेळीतील एक प्यादे म्हणून सहज वापरला जाणारा पक्ष झालाय. प्रत्येक निवडणुक ही "अभी नही तो कभी नहीं" या त्वेषाने लढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काॅंग्रेसला एकिकडे हिंदू मतांचे विभाजन करतांना धार्मिक ध्रुवीकरण घडवत मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान करवून घेण्यात लोकसभेत यश आले. 

"हिंदू विरोधात एकजूट होणारे मुस्लिम मतदार" ही खेळी आत्मघातकी आहे हे काॅंग्रेससह अनेक पक्षांना कळत असूनही वळत नाही. "एकपुस्तकी आदेश" प्राणा पलीकडे प्रिय  असणाऱ्या कडव्या धर्मांध मंडळींच्या मनात  "काफिर" कोण याबाबद स्पष्टता आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या काॅंग्रेसला आणि हिंदुत्वाला विरोध म्हणून एकजूट होणाऱ्या मुस्लिम समाजाला दाखवून देण्यासाठी एक हिंदू म्हणून आपल्याला या चालीवर मात करणारी चाल रचावीच लागेल. या विधानसभा निवडणुकीत प्रचारात असंख्य मुद्दे असतील. पण माझ्या दृष्टीने आता फक्त एकच लक्ष्य. लोकसभेत झालेल्या मुस्लिम एकगठ्ठा मतदानाला सडेतोड उत्तर देणे. मित्रांनो, जशास तसे न्यायाने हिंदू पण वागू शकतो हा इशारा देण्यासाठी ही विधानसभा निवडणुक आहे. त्याला उत्तर देताना सगळे मुद्दे नंबर दोनवर ठेवायला लागतील आणि हिंदू म्हणून एकजूट दाखवत मतदान करतांना नव्हे प्रत्युत्तरादाखल हे करावेच लागेल.  

उद्योग पळवले, मराठी माणूस, शेतमालाला भाव, अडानीच्या घशात धारावी, बेरोजगारी, आरक्षण, वगैरे या प्रचार दरम्यान येणाऱ्या मुद्द्यांवर विचार करणाऱ्या हिंदू समाजाने आता मत विभाजनाच्या सापळ्यात अडकणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे. या विधानसभेत मी मतदान करणार ते केवळ एकच मुद्द्याला चोख उत्तर द्यायला... जर निवडणुकीत रास्त प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ धर्म म्हणून तुम्ही मुस्लिम एकगठ्ठा मतदान तिकडे करणार असाल तर मी हिंदू म्हणून हिंदुत्वासाठी, हिंदू राष्ट्रवादासाठी भाजपला मत देईनच पण ते मतदान एकगठ्ठा व्हावे यासाठी प्रयत्न करेन. इतिहासात घोरीशी लढताना पृथ्वीराज चौहान एकटा पडला होता. त्याच्या मदतीला अन्य हिंदू राजे धावून आले नाहीत. पण आज मात्र एकजूट होईल.‌ लक्षात ठेवा एखाद्या जातीय दंग्यात एखादा खान, कुरेशी, मोमीन मरतो तेव्हा तो फक्त मुस्लिम असतो तर जेव्हा एखादा हिंदू मरतो तेव्हा त्याला जातीचे लेबल लागते. 

तुम्ही डाव टाकला होता त्याला प्रतिडाव टाकून या विधानसभेत चोख प्रत्युत्तर द्यायचे आहे. जर हिंदू एकजूटीने रणांगणात उतरला तर काय होते हे दाखवून द्यायची हीच नामी संधी आहे. आपले प्रश्न तर आहेतच आणि ते अनेक निवडणुकीत होते अन राहतील पण आधी अस्तित्व महत्वाचे ! धर्म म्हणून ते एकजूट दाखवत आव्हान देत असतील तर त्याला प्रतिडाव रचून मुकाबला हा करावाच लागेल. मित्रांनो, येत्या २० तारखेला मतदानाला जातांना लक्षात ठेवा.  

© बिंदुमाधव भुरे

9 comments:

  1. खूप छान विश्लेषण केले आहे. हीच वेळ आहे हिंदूंना जागृत होण्यासाठी. तसे न करणे म्हणजे आत्मघात होय. तुम्ही म्हटल्याप्रमाणे वैचारिक गोंधळात पडण्यापेक्षा हिंदूंनी आपल्या विचारात स्पष्टता आणावी. आपल्याकडे बरेच वैचारिक पंडित गोंधळ करून द्यायला सरसावले आहेतच. त्यांना धुडकावून लावूनच एकत्र यावं लागेल

    ReplyDelete
  2. सद्य परिस्थितीत तुम्ही जो मुद्दा मांडला आहे तो बरोबर वाटतो. पण हे सर्व राजकारणी खरेखुरे समाजकारण कधी करणार कुणास ठाऊक. यांच्या गलिच्छ राजकारणात सर्वसामान्य माणूस भरडला जातोयं.

    ReplyDelete
  3. उत्तम विवेचन , सत्य हेच आहे

    ReplyDelete
  4. खुपच उत्तम, ह्या नतर्. धर्मांतर् हे पण बघावे लागेल
    या आमच्या बरोबर्

    ReplyDelete
  5. खूप छान, विस्तृत, मुद्देसूद आणि सखोल अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  6. भारतातील सर्व मुसलमान हे पूर्व आश्रमीचे हिंदूच आहे त. छळाब ळाने आणि प्रलोभनाने ते मुस्लिम झाले आहेत त्यांना हिंदू करून घेण्याची प्रक्रिया वेगवान करणे,त्यांना पुन्हा हिंदू करून घे णे हाच एकमेव उपाय आहे, हिंदूंचे इन्कमिंग चालू करा आपोआप मुसलमानांचे आउटगोइंग चालू होईल. पण भाजपा सह कुठलाही पक्ष याबाबतीत काहीही बोलत नाही ज र हिंदूंनी फोटो पण नियोजन केले आणि मुसलमानांनी लोकसंख्या वाढवली तर जे व्हायचे तेच होणार.

    अजूनही 70 टक्के मुसलमान घरात हिंदू रीत रिवाज पाळतात.
    दुसरा मुद्दा हिंदूने इतके एकजूट व्हावे ही काँग्रेस सह सर्व पक्षांना हिंदू वव्होट बँकेची दखल घेतली जाने भाग पडावे.

    ReplyDelete
  7. Absolutely correct.
    Please all the Hindus and all castes please think in a positive way and vote for BJP.
    Please keep your caste aside and vote for National cause for all.
    Please Vote for BJP.
    Thank you.
    🙏♥️🙏

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर विश्लेषण.
    अर्बन नॅक्सलचे अनेक चेहरे असा एक विषय पण होऊ शकतो तुम्हाला शक्य असेल तर त्यावरही प्रकाश टाका.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर आणि मार्मिक लेख. खूप छान

    ReplyDelete